Wednesday, August 20, 2008

ओम मृत्तिकायै नमः

कुठल्याही कार्याचा आरंभ करताना श्री गणेशाला वंदन करण्याची आमची संस्कृती आणि प्रथा आहे. श्री गणेश अर्थात गणपती ही बुद्दिदेवता असल्याचे आपण मानतो. सर्व देवतांनी मिळून त्यांना अग्रपूजेचा मान बहाल केल्याची आख्यायिका प्रचलित आहे.विघ्नहर्ता असल्याने कार्याचे शुभ फल देण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना करावी असा परिपाठ रूढ झालेला आहे. त्याला माझा विरोध नाही. मतभेद नाही,तरी मी माझ्या या ब्लॉगचा आरंभ मातीला नमन करून करीत आहे.

माझे नाते आणि तिच्याबद्दलची ओढ मला कळू लागण्याच्या आधीपासून आहे. "माती' या शब्दात "माता' हा शब्दही कोरून काढता येतो.त्यामुळेही असेल. मातीही माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून आहे.माणूस मेल्यावरही ती राहते. आयुष्यभर ज्या शरीराचे हवे नको ते सर्व लाड, चोचले पुरवितो, ते शरीर जाते कुठे? चिमूटभर राख होऊन मातीतच मिसळते.

कबीर सांगूनच गेलाय,
माटी कहे कुम्हारसे, तू क्‍या रोंदे मोंहे
एक दिन ऐसा आयेगा, मै रों दू तोंहे

आयुष्य आणि जीवन दोन्ही व्यापून, दशांगुळेच काय, त्याहीपलीकडे उरते ती मातीच! ती सर्वव्यापी आहे आणि सर्वजायाही आहे.तिची महती गाणारे माझे शब्दही कदाचित एक दिवस या मातीतच मिसळून जायचे. माती मला नेहमी भौतिक नजरेच्या आणि ज्ञानचक्षुच्या पलीकडे गेलेली, अनंतापर्यत पसरलेली वाटते. तिचा विस्तार, पसारा दिङमूढ करतो.तिच्यासमोर मस्तकच नव्हे सारे अस्तित्व नत होते, झुकते. तिला नमनाचे वंदन नको करायला?
आणि, गणपतीसुद्धा पार्वतीच्या अंगावरील मळातून म्हणजे मातीतूनच नाही का जन्मला !

6 comments:

sanjayghugretkar said...

मा. सुरेशजी नाईक
नमस्कार -
आजच्या प्रचंड गतीच्या बदलत्या जगात माहितीशास्त्राचा विस्तार झपाट्याने होत आहे, याला कारण माहितीतंत्रज्ञान! आपणही सर्वांना आवडणाऱ्या आणि आजच्या जगात आवश्‍यक अशा "ब्लॉग'विश्‍वात पदार्पण केलंय, ही आनंदाची गोष्ट आहे. आपण गणेशाबरोबरच मातीचेही गायन केले आहे. त्यात तथ्य तर आहेच, शिवाय मातीचा नवा अर्थही चांगलाच समजतो. धन्यवाद!

- संजय घुग्रेटकर
ग्रंथपाल, उपसंपादक, गोमंतक

aryamadhur said...

Suresh Naik,
Very Nice.
Arvind Shirsat

bharatipawaskar said...

Respected Suresh Sir,

Visited your Blog. Wish to write in Marathi but do not know how to so I shall type in Marathi and paste my comment here, later.
The fertile thoughts from this son of the soil are a delight and food for thought. wishing you all that Mother Nature can bestow. Best of Luck.
Bharati Pawaskar, Feature Editor, Herald, Panaji - Goa

prajkta said...

नाईक सर,
ब्लॉगवरील पहिली पोस्ट वाचली. मनापासून आवडली. या शिवाय तुम्हीही "आणखी' समजलात. (तसे तुम्ही पूर्ण कधीच समजणार नाहीत). ठसे वाचले होते. खूप दिवसानंतर तुमचे लिखाण वाचायला मिळाले. याचा आनंद आहेच. पुनःपुन्हा वाचनाचा आनंद मिळावा ही अपेक्षा.
गजानन लवकरच येतील... त्यामुळे...मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ

bharatipawaskar said...

Hi,
We are expecting fresh thoughts that hit you every day. Why don't you update regularly? Let the dialogue start between you and your fan club. Let this pleasure hunt for thought proviking ideas begin...
Gajal

hi-kinva-ti said...

Apalya ya blogla sundarse naav suchaley - Mrudgandh! Maaticha sugandh yenarya ya lekhanala hech naav samarpak tharel, nahi ka? Matila naman karun suru kelela ha lekhan prapanch asach pudhe nenyasathi shevti aapli maati ani aapli manasch upyogi thartil. Jase mhatale jate ki karya siddhis nenyas Shree samarth aahe tasech he lekhan-karya siddhis nenyas maati samarth aahe. Maatichi mahati anant ani akshay asate he aapan jantach, tevha kadhich nirmalya n tharanari hi aksharphule tilach arpan karu...
Mi kon ha prashn padlay? Maativar tumchyaetakich shraddha asanari hi kinva ti!